धक्कादायक :- खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दिल्ली येथे दुःखद निधन Shocking :- MP Balubhau Dhanorkar passed away tragically in Delhi

540

🔸राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, जिल्ह्यात पसरली शोककळा(Excitement erupted in the political circles, mourning spread in the district)

चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.30 मे) :- जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपला ठसा उमटवून भल्याभल्यांना आव्हान करणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य कामगिरी करणारे खासदार वाळू धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.