वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.12 ऑक्टोबर) :- सावली तालुक्यातील गेवरा बिटाअतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक-९२० मध्ये गुराखी गुरे चारीत असताना कळपावर वाघाने हल्ला चढवीत एका गायीला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना भीती निर्माण झाली आहे. नागरिक भयभीत झाले असून गायीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

       तालुक्यातील सायखेडा येथील गुलाब शंकर वाघरे यांचा मालकीची गाय आहे.येथिल ४ते५ गुराखी मिळून नेहमी प्रमाणे गुरे चराईसाठी नेले होते. गुरे चरत असतांना वाघाने अचानक हल्ला चढविला. गुराखी आरडाओरडा करीत वाघाला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ शिकार करण्याच्या प्रयत्नात असल्याने गुराखीवर गुरगुरल्याने गुराखी जीव मुठीत घेऊन पळ काडीत ईतर गुरेढोरे यांचा जीव वाचवीत रस्त्यावर काढून घराकडे परत आणले.

या घटनेची माहिती बिटातर्गत येणाऱ्या वनरक्षकाला दिली आहे.वनरक्षकाने घटना स्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे.या वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.