आ. प्रतिभाताई धानोरकर.यांच्या हस्ते आपला दवाखान्याचे थाटात उद्घाटन come Grand inauguration of our clinic by Pratibha and Dhanorkar

590

✒️ शिरिष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.2 मे) :- 

            महाराष्ट्र दिन यानिमित्ताने आपला दवाखाना वरोरा शहरांमध्ये सुरू करण्यात आला आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रत्येक शहरांमध्ये आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ऑनलाईन पद्धतीने केले व तसेच वरोरा येथील आपला दवाखान्याचे उद्घाटन माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी फित कापून केले.

तसेच या कार्यक्रमाला उपस्थित माननीय गजाननराव भोयर मुख्य अधिकारी नगरपरिषद वरोरा तसेच तहसीलदार मधुकरराव काळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंकुश राठोड तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रतीक बोरकर, तसेच डॉक्टर बाळू मुंजनकर, तालुका आरोग्य अधिकारी व इतर मान्यवर व अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, आणि गावातील नागरिक हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळू मुंजनकर यांनी केले आपला दवाखाना हा उपक्रम वरोरा शहरांमध्ये तीन विभागात चालू करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचा वेळ दुपारी 2 ते 10 असल्याने जे मजूर वर्ग सकाळीच कामावर निघून जातात व संध्याकाळी सहा सात वाजता घरी येतात त्यावेळेस त्यांना औषध उपचार मिळावा ही संकल्पना खूप उपयुक्त ठरेल कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. प्रतीक बोरकर यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अध्यक्षिय भाषण करताना सांगितले की या उपक्रमामुळे वरोरा शहरातील व इतर जनतेचा नक्कीच फायदा होईल तसेच उपजिल्हा रुग्णालयावर असलेला ताण कमी होईल अतिशय चांगली संकल्पना असल्याचे त्यांनी म्हटले कार्यक्रमाचे संचालन श्री सतीश येडे आरोग्य सहाय्यक उपजिल्हा रुग्णालय यांनी केले व तसेच कार्यक्रमाचे आभार श्री बोरीकर आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरोरा यांनी मानले.