वरोरा येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाला

🔸खिदमत सोशल फाऊंडेशन चा उपक्रम

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.8 ऑक्टोबर) :- जगाला मानव सेवा हीच श्रेष्ठ सेवा हा संदेश देणारे हजरत मोहम्मद सल्लल्लोहो अलेंही व सल्लम यांच्या जयंती महोत्सव निमित्त येथील खिदमत सोशल फाउंडेशन व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ऑक्टोबर रोज शनिवारला भव्य रोग निदान शिबिर संपन्न झाला. 

   शिबिराचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते डॉ.हेमंत खापने, शहर काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शिबिरात 600 नागरिकांनी शिबिरचा लाभ घेतला. रक्तदाब, ब्लड शुगर, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, आतड्याचे आजार, पोटाचे आजार, मणक्यातील गॅप, त्वचेचे विविध आजार इत्यादी रोगांचे निदान व त्यावर उपचार करून रूग्णांना मोफत औषधही वापट करण्यात आली.

              या रोग निदान शिबिरात उपजिल्हा रुग्णालय वरोरा ची टिम उपस्थित होती. डॉ.उल्हास बोरकर( अस्थि रोग तज्ञ), किरण धांडे, तनिष्का खडसाने, गोविंद कुंभारे (समुपदेशक ICTC), 

आरोग्य मित्र अमोल भोंग यांनी येणाऱ्या नागरिकांचे प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेचे 109 कार्ड आणि आभा 79 कार्ड बनवून दिले गेले. 

      या भव्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी खिदमत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद आसिफ रजा, उपाध्यक्ष सादिक इकबाल थैम, सचिव वसीम इकबाल शेख,कोषाध्यक्ष नियाज अय्यूब सय्यद, मकसूद शेख साजिद पठाण, शोएब शेख, नकीब काजी, समीर अजमेरी,अन्सार हुसेन शेख ,तनवीर शेख, अबरार सय्यद, रजा सय्यद, आसिफ पठाण, अब्दुल सोनीश, कबीर शेख, इसरार शेख, सय्यद अमीनुद्दीन, कैफ, मोईन शेख, कैफ शेख, आमिर शेख, तोसिम शेख, अरशद शेख व अन्य लोकांनी परिश्रम घेतले.