बोडखा मोकाशी येथे भारूड, नृत्य व व्यक्तृव स्पर्धाचे आयोजन

27

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.9 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे एक गाव एक सार्वजनिक गणपती असा आदर्श ठेऊन अष्टविनायक बाल गणेश मंडळ यांच्या सौजण्याने, नागपूर येथील प्रसिद्ध विनोदी भारूड करणारे हरी भक्त पारायण खुशाल महाराज यांचे भारूड चे आयोजन दिनांक 10/10/2023 रोज मंगळवारला संत गजानन महाराज मंदिर बोडखा मोकाशी येथे सायंकाळी 9वाजता करण्यात आले आहे तरी समस्त भाविक भक्तांनी भारूड चा आनंद घ्यावी ही विनंती अष्टविनायक गणेश बाल मंडळ बोडखा च्या वतीने केलीआहे.तसेच गुरुदेव सेवा मंडळ बोडखा च्या वतीने स्वछता, नृत्य, वक्तृत्व स्पर्धाचे 7 वाजता आयोजन करण्यात आले.

स्पर्धेत पारितोषिक मिळणाऱ्या स्पर्धाकांना बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे. गावतील नागरिक कसा असावा, सामुदायिक प्रार्थनेचे महत्व, गावात स्वछता कशी राखावी या तीन विषयवार वक्तृत्व स्पर्धेचे विषय राहणार असुन युवक तरुणांनी या व्यक्तृव स्पर्धेत भाग घ्यावा अशी विनंती गुरुदेव सेवा मंडळ बोडखा मोकाशी यांनी केली आहे. 

 श्रीगणेशा ला वंदन करून संत गजानन महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला आदर्श मानून स्पर्धाचे व भारूड चे आयोजन एकाच दिवशी करण्यात आले आहे.