शेगांव (खुर्द) येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर व अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 ऑक्टोबर) :- शेगांव (खुर्द) येथील नवीन बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर व अभ्यासिका सुरू करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन डॉ. प्रकाश महाकाळकर सर गटशिक्षणाधिकारी भद्रावती यांच्या हस्ते झाले तर सहउद्घाटक म्हणून ज्ञानेश्वर चहारे सर गटशिक्षणाधिकारी वरोरा हे उपस्थित होते , या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश मेश्राम सर ठाणेदार पोलीस स्टेशन शेगांव (बु) हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातुन आपले ध्येय गाठावे , असे प्रतिपादन डॉ प्रकाश महाकाळकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा उपयोग सातत्याने करावा , असे अविनाश मेश्राम सर या प्रसंगी म्हणाले. या अभ्यासिका करिता ‘एक पुस्तक गावासाठी ‘ ही नवी संकल्पना शेगांव (खुर्द) चे युवा सरपंच मोहित लभाने यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बोलतांना मांडली.

       गावातील तरूणी कुमारी सारिका मधुकर जिवतोडे हिची BSF मध्ये निवड झाल्यामुळे श्री गुरूदेव सेवा मंडळ शेगांव (खुर्द) व ज्ञानेश्वर चहारे सर गटशिक्षणाधिकारी वरोरा यांच्याकडून शाल, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रार्थना मंदिर व अभ्यासिका सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसहभाग, गावातील जनतेचे श्रमदान तसेच वेगवेगळ्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची साथ लाभली त्यामुळे आपण हे कार्य पार पाडू शकलो , असे मत चंद्रशेखर भिवदरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मांडले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राऊत सर विस्तार अधिकारी शिक्षण वरोरा, अंबादासजी जिवतोडे सर्वाधिकारी श्री गुरूदेव सेवा मंडळ शेगांव (खुर्द), बाबुलालजी आत्राम पोलीस पाटील, अनिल मत्ते सर केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिक शाळा शेगांव (खुर्द), श्री शिरपुरकर साहेब ग्रामसेवक शेगांव (खुर्द) हे उपस्थित होते. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मांडवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास हजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कमेटी, श्री गुरूदेव सेवा मंडळ, विकास ग्रुप, शाळा व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण शेगांव (खुर्द) ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.