पीएसआय डॉ.विजय साळवे हिंदी लेखन प्रारूप स्पर्धेत अव्वल

✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी) 

बुलढाणा(दि .30 जून) :- जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असलेले आरसीएफ सिंघम पोलीस अधिक म्हणून ओळखले जाणारे कर्तव्यदक्ष आरसीएफ उपनिरीक्षक पीएसआय आमचे मित्र डॉ.विजय साळवे भुसावळ रेल्वे डिव्हिजनच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदी प्रारूप लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि वाक प्रतियोगिता मध्ये प्रेरणास्थान प्राप्त झाले .

             भुसावळ रेल्वे डिव्हिजनच्या वतीने चार जून ते सहा जून च्या दरम्यान संपूर्ण डिव्हिजन मध्ये हिंदी निबंध स्पर्धा हिंदी प्रारूप स्पर्धेसह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शेगाव रेल्वे स्टेशनवर आरसीएफ मध्ये उप पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले पीएचडी प्राप्त डायरेक्ट मिळवलेले डॉ .विजय साळवे यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला त्यांनी भाग घेतलेला स्पर्धेत हिंदी लेखन स्पर्धेत हिंदी टिपण स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे तर हिंदी वाक स्पर्धेत प्रेरणास्थान प्राप्त झाले. निकाल जाहीर होतात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला .डॉ. विजय साळवे यांचे मित्र माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती अमरावती विभागीय संघटक पत्रकार सारंग महाजन यांनी पण शुभेच्छा दिल्या.