अर्जुनी तलावाला वनविभाग तसेच पक्षी तज्ञांनी दिली भेट

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

शेगाव बू (दि.4 जानेवारी):- ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे वाघासाठी सगळीकडे प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी फिल्म स्टार, मंत्री, विदेशी पर्यटक वाघ पाहण्याकरीता येत असतात.

या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघ, अस्वल ,बिबट,सांभर, रानगवा,चितल,भेडकी, नीलगाय,मगर, यासह राष्ट्रीय पक्षी मोर, सगळ्यांना दिसत असून ताडोबा राष्ट्रीय उद्यान मध्ये येणाऱ्या पर्यटकाला जवळपास 180 प्रजातीचे पक्षी सुद्धा पाण्यासारखे आहेत, त्या करीता पक्षीप्रेमी तलावाच्या ठिकाणी पक्षी पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात जात असतात.

वेगवेगळ्या पक्षाची आवड असलेले पर्यटक ताडोबा भ्रमण करताना ज्या ठिकाणी तलावाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन ते पशु पक्षाचा आनंद घेत असुन अशीच एक भेट ताडोबा कोर अंतर्गत येत असलेल्या अर्जुनी गावातील तलावाला डॉ.धिरज पाटील पक्षीतज्ञ नागपूर, त्यांचे सहकारी व वन विभागाची कर्मचारी पक्षी निरीक्षण करून भेट दिली.