चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना न्याय द्या : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किशोर टोंगे यांची मागणी

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.6 डिसेंबर) :- राज्य सरकारने राज्यात पहिल्या टप्प्यात 39 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला व त्यानुसार नुकसान भरपाई मोबदला देण्याच्या सूचना दिल्या. मात्र इतक्या कमी तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याने सत्तापक्षातीलच विविध आमदार व मंत्री यांनी नाराजीचा सुर आवळला आणि तेव्हा राज्यात आणखी 169 मंडल क्षेत्रात दुष्काळ घोषित करण्यात आला मात्र या दोन्ही वेळेस आपला चंद्रपूर जिल्हा आणि विशेषतः ज्या वरोरा आणि भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले ते तालुके अभागी ठरले.

यावेळी किशोर टोंगे म्हणाले कि, तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केले आम्हीही उपोषण केले, जिल्हाधिकारी प्रशासन, पालकमंत्री, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांना माहिती असताना देखील कॅबिनेट बैठकीत किंवा इतर ठिकाणी लोकप्रतिनिधी कडून कुठलाही आवज उठवण्यात आला नाही ही आमच्या शेतकऱ्यांची प्रतारणा आहॆ.

येत्या अधिवेशनात लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांनी वरोरा भद्रावती तालुक्यातील सोयाबीन शेतकऱ्यांचा मुद्दाम लावून धरावा आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी किशोर टोंगे यांनी केली.