नाशिकच्या कवयित्री शुभांगी पाटील साहित्यकेसरी महाकाव्य करंडकाच्या मानकरी

42

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.10 सप्टेंबर) :- येथील शाई प्रतिष्ठानच्या वतीने दि ९ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय खुली काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला होता. नाशिकच्या सुप्रसिद्ध कवयित्री शुभांगी पाटील यांनी येत भरून आभाळ पण कोसळत नाही. असा उंबरा दु:खाला रोज लावते ग बाई आणि आज वाटते इथे तुम्ही हवे होता.

शिवराय गुन्हेगार झाला मोठा कोण देईल हो न्याय हवे होता शिवराय या कविता सादर करून स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा साहित्यकेसरी महाकाव्य करंडक २०२३ पटकविला. प्रथम क्रमांकाचा साहित्यकेसरी महाकाव्य करंडक व रोख रक्कम दहा हजार रू सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, रानकवी हनुमंत चांदगुडे, कवी सागर काकडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. कवयित्री शुभांगी पाटील या आदिवासी अंतर्गत अनुदानित आश्रमशाळा डहाळेवाडी येथे रेक्टर म्हणून गेली अनेक वर्ष आश्रमशाळेतील मुलांची मनोभावे सेवा करीत असतात त्यांचे हे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.

कवयित्री शुभांगी पाटील यांची प्रत्येक कविता ही समाजाला दिशादर्शक अशी असते तसेच कवितांचे सादरीकरण पण रसिक प्रेक्षकांना भावते त्यामुळेच त्या संपूर्ण महाराष्ट्र कवयित्री म्हणून सुप्रसिद्ध आहेत. साहित्यकेसरी महाकाव्य करंडक मिळाल्याबद्दल त्यांचे साहित्यक्षेत्रात, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कडून विशेष कौतुक होत आहे.