✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.10 सप्टेंबर) :- येथे ओबीसी महापंचायतीच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती यावेळी किशोर टोंगे (kishor tonge)बोलत होते.
राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठावड्यात आंदोलन सुरु असून मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. याविषयी बोलताना टोंगे म्हणाले की, मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबोसी समाजाला अगोदरच तटपुंजे आरक्षण मिळत असून मराठा समाजाचा समावेश झाल्यास वाटेकरी वाढतील आणि मूळ असलेल्या लोकांवर अन्याय होईल. मराठा समाजाला आरक्षण गरजेचं आहे मात्र त्यांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावं ही आमची भूमिका आहे असं ते म्हणाले.
