स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन चित्रकार महेश मानकर यांचा सत्कार

▫️महेश मानकर यांनी जगातील ३० देशात केले भारताचे प्रतिनिधीत्व(Mahesh Mankar represented India in 30 countries of the world)

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.8 सप्टेंबर) : – शिक्षक दिनानिमित्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि.५ सप्टेंबर ला स्थानिक श्री मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश मानकर यांचा रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महेश मानकर हे भद्रावती चे रहिवासी असुन सध्या ते ललितकला विभाग, नागपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे संपुर्ण शिक्षण कला शाखेतून पुर्ण केले. त्यांच्या काढलेल्या चित्रांना आपल्या देशातच नाही तर जगातील ३० देशात प्रदर्शित करण्यात आले. त्यात १७ चित्रांना पारितोषिक सुध्दा मिळाले आहेत. हे आपल्या देशाचीच नाहितर भद्रावती शहराला सुध्दा अभिमानाची बाब आहे. त्यांच्या याच कार्याला सलाम करण्यासाठी रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेवुन ट्रस्ट तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रविंद्र शिंदे यांचे सोबत, आचार्य ना. गो. थुटे, सेवा निवृत्त प्राचार्य आबाजी देवाळकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक भाऊराव कुटेमाटे, प्रविण आवारी  आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. सुधीर मोते तसेच आभार प्रदर्शन ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे यांनी केले.

“रविंद्र शिंदे यानी माझा सन्मान केला याचा मला आदर आहे. त्यांनी दिलेल्या सन्मान चिन्हामुळे भविष्यात मला देशासाठी काम करण्याची उर्जा मिळाली. मला खुप पारितोषिक मिळाले पण मला माझ्या गावातुन सन्मान मिळाला याने मी भारावून गेलो. रविंद्र शिंदे आणि ट्रस्ट ला धन्यवाद. : चित्रकार – महेश मानकर”