सौ.सुषमा भाके यांचा सेवानिवृत्तीपर निरोप तथा सत्कार समारंभ संपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू .(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.31 जानेवारी) :- स्थानिक चारगाव बूज. येथील चिमूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित नेहरू विद्यालय चारगाव बूज. येथील सहाय्यक शिक्षिका सौ सुषमा भाके यांचा सेवानिवृत्तपर निरोप तथा सत्कार समारंभ घेण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमूर चे सर्व पदाधिकारी श्री पू.शा. गावंडे , श्री मनोजराव गावंडे , श्री गणेश गावंडे , तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राणे श्री देवेंद्र रामटेके शिक्षक यांच्या हस्ते सौ भाके यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह तसेच भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

याच सोबत गावातील तसेच येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांनी देखील त्यांना साळी चोळी तसेच भेट वस्तू देऊन त्यांना सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सौ सुषमा भाके (काकडे) यांनी चिमूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित असलेल्या अनेक शाखेमध्ये आपली सेवा दिली परंतु चारगाव बूज.येथील विद्यालयात १५ वर्ष सहायक शिक्षकेची भूमिका दर्शवून गावकऱ्यांची तसेच विद्यार्थ्यांची सेवा केली. त्याकरिता गावाशी असलेले नाते हे न तुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. करिता येथील श्री संत सद्गुरू नानाजी महाराज यांच्या मंदिरास समई भेट देऊन त्यांनी आपला निरोप घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भलमे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.गेडाम व कू.मेश्राम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी येथील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री गोकुलदास डोंगे, दीपक गावंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला चिमूर एज्युकेशन सोसायटी चिमूर द्वारा संचालित असलेल्या सर्व विद्यालयाचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.