नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव(बू) येथे शिक्षक दिन साजरा Teacher’s Day Celebration at Nehru Vidyalaya and Junior College Shegaon (BU)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.6 सप्टेंबर) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रथम सकाळ सत्रात स्वयंशासनाचे आयोजन करण्यात आले यात 5 ते 10 च्या विद्यार्थांनी सहभाग घेतला.

यात कुणी मुख्याध्यापक, कुणी शिक्षक, कुणी लीपीक तर कुणी शिपाईच्या भुमीकेत होते. यानिमित्त शिक्षकांन काही वेळ विश्रांती मिळाली. दुपारी शिक्षक दिन कार्यक्रम घेण्यात आला.

यात दोन मुख्याध्यापक होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री ढाकुणकर सर, प्रमुख पाहुणे श्री लांजेवार सर, श्री चांगले सर, श्री शंभरकर सर, तसेच कार्यक्रमाचे संचालन मानसी कोडापे हिने केले.

या कार्यक्रमात उत्तम कार्य करणा-या स्वयंशासन स्पर्धेतील शिक्षकांना गोल्ड, सिल्व्हर, ब्रांझ मेडल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमचे नियोजन सौ हिवरकर मॅडम व श्री उरकुडे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.