जिल्ह्यात पुन्हा घोणस अळीचा शिरकाव Ghonas Ali re-introduced in the district

▫️शेतकरी शेतमजुरांच्या पुन्हा भीतीचे वातावरण(Again the atmosphere of fear of the farmers)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.5 सप्टेंबर) :- सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील शेतकरी विश्वनाथ ढोणे यांच्या शेतात विषारी घोणस अळी आढळली असून त्यांचा मुलगा सचिन विश्वनाथ ढोने शेतात काम करीत असताना त्याच्या डाव्या हाताला या घोणस अळी ने दंश केला .सचिन डोने या युवकाला अळीने दंश केल्याने प्रकुती अस्वस्थ वाटू लागल्याने तो रत्नापुर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रुग्णालयात धाव घेतली.रुग्णालयात त्याचवर उपचार झाला असून त्याची प्रकुती आता बरी आहे.हि घटना सोमवारला सकाळला घडली.या घटनेमुळे शेतकयामधे खळबळ उडाली असून, भीती निर्माण झाली आहे.

सद्या शेतीचा हंगाम सुरु असून चंद्रपुर जिल्हा धान(भात)साठी प्रशिद्ध असून सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी भाताची लागवड करतात.आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सद्या शेतीचा हंगाम।असून शेतामधे निदंन काढ़ने, पारीवरचा गवत काढ़ने सुरु आहे.शेतकऱ्यांना नेहमीच विविध संकटांचा सामना करावा लागतअसतो. अशातच आता एक नवे संकट उभे राहिले आहे. सिंदेवाही तालुक्यात प्रथमच रत्नापुर येथे घोणस अळी आढळल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे.

  पावसाचे दिवस असल्याने पावसामुळे शेतातील बांधावर गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतात विषारी घोणस अळी आढळून येत असते. या अळीचा मानवी त्वचेशी संपर्क झाला तर तीव्र वेदना होत असतात.या अळीला इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे नाव आहे. या नवीनच संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्लज कॅटरपिलर ही एक बहुभक्षी कीड असून बांधावरील गवतावर, झाडावर, पिकांवर आढळून येते. 

शक्यतो पावसाळ्यात ही अळी आढळते. या अळीच्या अंगावर बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात. यातूनच या आळ्या स्वसंरक्षणासाठी विशिष्ट रसायन सोडतात. या रसायनाचा त्वचेशी संपर्क झाला तर तीव्र वेदना होतात. संपर्क भागात चट्टे देखील दिसतात. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही.

अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात ही अळी आली तर तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसतात.रत्नापुर येथील कृषी सहायक यांच्याशी संपर्क केला असता, घोणस अळी आणि या घटने बद्दल माहिती दिली त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की,शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.असी घोणस अळी शेत शिवरात दिसल्यास तालुका कृषी अधिकारी तथा कृषी सहायक यांना माहिती द्यावी ,असे आवाहन केले आहे.