उपविभागीय अधिकारी राठोड यांनी केली पुर बाधीत परिसराची पाहणी Sub Divisional Officer Rathod inspected the flood affected area

81

▫️पुर बाधीत नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जगदीश नरवाडे यांची मागणी(Jagdish Narwade’s demand for rehabilitation of flood affected citizens)

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavtamal प्रतिनिधी)

महागाव(दि.24 ऑगस्ट) :- वारंवार पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने पुरग्रस्त नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती त्याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी या पुर बाधीत क्षेत्राची पाहणी केली.

पुस नदीच्या काठावर वसलेल्या हिवरा(संगम) येथील वार्ड क्र १मधील अंदाजे साठ घरांना नेहमीच पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत असल्याने या पुर बाधित नागरिकांनी आपले पुनर्वसन करण्यात यावे यासाठी वारंवार लोकप्रतिनिधींना साकडे घातले परंतु कोणीही दखल घ्यायला तयार नसल्याने अखेर या नागरीकांच्या मदतीसाठी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे हे धावुन आले असुन त्यांनी या पुर बाधीत नागरिकांना सोबत घेवुन हाहाःकार मोर्चा काढून हिवरा येथील पुरपिडीत नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती.

त्यांच्या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी आज गुरुवार(२४ऑगस्ट)रोजी हिवरा येथे भेट देवुन पुर बाधीत क्षेत्राची पाहणी करून ग्रामसेवक व तलाठी यांना शासनाच्या ई क्लास जागेचा अहवाल व ग्राम पंचायतच्या ग्रामसभेचा ठराव घेण्याच्या सुचना करून जागेचा अहवाल व ग्रामसभेचा ठराव आल्यानंतर आपण शासनाकडे पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले.

आज पर्यंत कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी याठिकाणी पाहणी करण्यास आला नसल्याने जन आंदोलनचे जगदीश नरवाडे यांच्या प्रयत्नामुळेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी केल्यामुळे या पुरग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करून जगदीश नरवाडे व डॉ.राठोड यांचे आभार मानले.

 यावेळी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे, उपसरपंच शरद कदम, राजू भाऊ धोतरकर मंडळ अधिकारी एम. एकुलवार,तलाठी वाघमारे,ग्रामसेवक व्ही.डी.सावळकर, महसुल कर्मचारी जीवन जाधव, ग्रा. पं.कर्मचारी सुधीर कदम,स्वप्निल बेलखेडे.

संतोष सावंत गजानन सुरोषे महेश कामारकर यांच्यासह पुर बाधीत क्षेत्रातील वनमाला गोपाल गंधेवार दिपाली रवींद्र लव्हाळे,शेख हसीना शेख नवाब, शेख बेबुल शेख गनी , शिलाबाई अशोक ठाकरे, शेख अल्ताफ, उमेश ठाकरे, अमोल थरकडे प्रशांत सुभाष राऊत , अर्चना बोरुळकर भक्तीप्रेरणा गंधेवार यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते