सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत सभासदांना दुचाकी वाहन वितरण Distribution of two wheelers to members under CDCC Bank Branch Bhadravati

Share News

▫️रविंद्र शिंदे यांच्या हस्ते टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना दुचाकी प्रदान(Ravindra Shinde presented a two-wheeler to the members of Takli Seva Co-operative Society)

▫️सुरक्षेच्या दृष्टीन दुचाकी गाडी चालवितांना न चुकता हेलमेटचा वापर करावा…रविंद्र शिंदे(From the point of view of safety, helmet should be used without fail while driving a two-wheeler…Ravindra Shinde)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.17 ऑगस्ट) :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे ग्राहक, सेवा सहकारी संस्था, त्यांचे सभासद यांना कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अग्रणी असून शुन्य एनपीए असलेली बँक म्हणून नावारुपास आलेली आहे. सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फतीने मध्यम मुदती कर्जाच्या माध्यमातून सभासदांना दुचाकी वाहन वितरण करण्यात आले.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक तसेच कर्ज समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सेवा सहकारी संस्था टाकळी सभासद गुणवंत सातपुते, देवराव आत्राम, बंडू उर्फ विठ्ठल आसेकर, प्रविण उपरे, संतोष लेडांगे व बबन मत्ते यांना एकुण पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी वाहन मध्यम मुदती कर्ज अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फत संस्थेच्या सहा सभासदांना वितरीत करण्यात आले.

 सुरक्षेच्या दृष्टीने आपला परीवार आपली घरी वाट बघत असतो आणी सर्वानी न चुकता जेव्हाही आपण गाडी चालवणार तेव्हा अर्जावून हेलमेटचा वापर करावा अशा सुचना रविंद्र शिंदे यांनी दुचाकी लाभार्थी तसेच जनतेला याप्रसंगी दिला.

 दुचाकी वितरण कार्यक्रमाला रविंद्र शिंदे यांच्या सोबतच सीडीसीसी बँक शाखा भद्रावतीचे शाखा व्यवस्थापक मधुसुधन वडगावकर, निरीक्षक राजू बारहाते, टाकळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण बल्की, उपाध्यक्ष विलास सातपुते, सचिव अक्षय क्षिरसागर, जेना उपसरपंच हरीचंद्र आसुटकर, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अरुण घुगल तसेच सीडीसीसी बँकेचे कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक दुचाकी वाहन वितरण सोहळयाला उपस्थित होते.

Share News

More From Author

स्वातंत्र्य दिनी भद्रावतीच्या दोन युवकांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून करुन अंत  On Independence Day, two youths of Bhadravati drowned in the river bed of Wardha

कुणी रस्ता देता काय रस्ता,रस्त्यासाठी करावा लागतो शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना Does anyone give a road? The farmers have to face many problems for the road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *