✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.21 ऑगस्ट) :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्याच्या आर्थिक उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता नवनवीन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित आनंद निकेतन कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिजदुरा येथे कृषी दुतांनी बीज टॅगबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
ज्यामध्ये कृषीदूतांनी शेतकऱ्यांना बीज खरेदी करताना कोणत्या टॅगचे बियाणे घ्यावी याबाबत माहिती दिली. त्यावरील संपूर्ण माहिती तपासून घ्यावी, ज्यामध्ये बीज शुद्धता, उगवण क्षमता व टॅगचा रंग याबद्दलच्या माहितीची खात्री करावी. प्रामुख्याने ट्रूथ फुल बियाणे शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांकडून मिळते. तसेच शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी सहा प्रकारचे टॅग व त्यांचा रंग व त्यांची माहिती तक्त्याद्वारे पटवून दिले.
या कार्यक्रमात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार सर, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन , कार्यक्रम समन्वक डॉ. एस. एन. पंचभाई , डॉ. ए. ए. मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये सातव्या सत्राचे विद्यार्थी हर्षल लोथे, शुभम गुंजाळ, ज्ञानेश्वर तायडे, हिमांशू सोनटक्के, भवानी प्रसाद व स्वरांशु मून इत्यादी सहभागी होते.
