महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त वाहन चालक धिरज खाडे यांचा शिक्षकांच्या वतीने सन्मान On the occasion of Maharashtra Day and Labor Day, driver Dhiraj Khade was honored on behalf of the teachers

152

✒️ शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.2 मे ) :- नेहमीच प्रवाश्याना वेगवेगळ्या स्थळापर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या वाहन चालकाचा धिरज खाडे यांचा महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून नागपूर चंद्रपूर चिमूर महामार्गावर छोटेखानी त्यांचा “संविधानाची उद्देशिका’, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सर्व शिक्षक – शिक्षिकांच्या वतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

सत्काराप्रसंगी वाहन चालक धिरज खाडे यांचे मन गहिवरून आले. ते म्हणाले गेली दहा वर्ष मी प्रवाशांना वेगवेगळ्या महामार्गाने ने आण करीत आलोय आहे. मात्र आजपर्यंत प्रवासा दरम्यान कुठलीही अनुचित दुर्घटना माझ्या हाताने घडली नाही आणि म्हणूनच प्रवाश्यांचे प्रेम अजूनही माझ्यावर कायम आहे. या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करून सर्व शिक्षक व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी नगाजी साळवे मुख्याध्यापक, वाळके सर, कुत्तरमारे सर , गावंडे सर, रुक्मिणी पेंदोर (तिराणिक), अनिता पेंदाम, ताठे मँडम, पल्लवी पातोड मँडम, जिवतोडे मँडम, पिजदुरकर मँडम, श्री परमानंद तिराणिक, श्री.मुन सर, श्री. दशरथ पेंदाम इत्यादी शिक्षक व शिक्षिका मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.