छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रथमतच माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण For the first time in Chhatrapati Shivaji Vidyalaya, flag hoisting by former student

✒️मनोहर खिरटकर खाबांडा(Khambada प्रतिनिधि)

खांबाडा (दि.18 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील खाबांडा येथे स्वातंत्र्यदिनी शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या देशाविषयी प्रेम, देशभक्ती निर्माण व्हावी, तथा विद्यार्थ्यानी या माजी विद्यार्थ्याचा आदर्श घ्यावा म्हणून बाळकडू बालपणीच त्यांच्या अंगी रुजविले जावे यासाठी १५ ऑगस्ट हा दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रथमच शाळेतील माजी विद्यार्थी डाँ गौरव अशोक हिवरे याने शाळेच्या आवारात ध्वजरोहण करण्याचा मान मिळविला. यावेळी मुख्याध्यपक राजु पारोधे पालकसंघाचे प्रतिनिधि प्रमोद देवतले, तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण भोयर ,सामाजीक कार्यकर्ते विजय बालपांडे,नरेन्द्र डाखोरे ,मनोहर खिरटकर, तसेच शालेचे शिक्षक,पारोधे.

उकिनकर सर,धोटेसर,लिपीक बबन लोडे,शिक्षक नंदकिशोर खिरटकर,जुमनाके सर,मोडक सर,जुनघरे,तथा इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन पाचभाई सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पडवे सर यांनी केले या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठि शिपाई दौलत तुराले यांनी अथक परिश्रम घेतले.