आदित्य पवार यांची स्वराज्यक्रांती सेवा संघातुन हाकलपट्टी – शिवभक्त अंकुश कुमावत Expulsion of Aditya Pawar from Swarajyakranti Seva Sangh – Shiv devotee Ankush Kumawat

98

✒️नाशिक(Nashik विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नाशिक(दि.27 ऑगस्ट) :- अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र प्रेणित स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र या शैक्षणिक व सामाजिक संघटन मधुन महाराष्ट्र उपाध्यक्ष आदित्य पवार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

      स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र नेहमी गरिब गरजु विद्यार्थांच्या शालेय शिक्षणासाठी व गोर गरिबांच्या पाठिशी खंबिर पणे उभी राहते.

    स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत नेहमी सामाजित क्षेञात अग्रेसर असतात.

   संटनातील प्रतेक सदस्यास काही नियम व अटी दिलेल्या असतात, त्या नियमांचे पालननं केल्यास स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेतुन काढुन टाकण्यात येते.

        अनेक दिवसांपासुन महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाचा कारभार सांभाळणारे व संघटनेशी एक निष्ठ असलेले आदित्य पवार यांचा प्रेम विवाह आहे परंतु त्यांनी आज पर्यंत विवाह केला नाही, दुसरी गोष्ट अशी कि त्यांनी कोर्टात जाऊन देखिल विवाह नोंद केलेली नाही, ते दोघंही एकञ आहेत

परिवारातील नारीचा सन्मान करत नाही, पत्नीला अश्लित भाषेत शिविगाळ करणे, आई ची ईज्जत न करणे, कामधंदा न करता घरातील लोकांवर रूबाब करणे आणी घरात व बाहेर नेहमी भाईगिरी ची भाषा वापरणे, स्वत:ला शिवभक्त म्हणुन घेणे परंतु शिवरायांचे विचार कधी लक्षात घेतलेच नाही, अशा अनेक कारणांमुळे त्यांना स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत यांनी कायमचे संघने मधुन काढुन टाकले आहे.

      या नंतर त्यांना कुठेही संघटने चे नाव वापरता येणार नाही, त्यांनी संघटन च्या नावाचा गैर वापर केल्यास संघटन व संघटन चे पदाधिकारी जबाबदार नसेल असे त्यांनी सांगितले.