संस्था अध्यक्षाकडून महिला लिपीकाचा विनयभंग ; तक्रारीनंतर अटक molestation of a female secretary by the president of the institution; Arrested after complaint

139

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 ऑगस्ट) :- तालुक्यातील घोडपेठ येथील सुभाष सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षाने कार्यालयात काम करणाऱ्या महिला लिपीकाचा स्वातंत्र्यदिनी विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली असून महिलेच्या तक्रारीनंतर गुरूवारी अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. 

घोडपेठ येथील सुभाष सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद घुगूल (५३) याने कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व निघून गेल्यानंतर महिला लिपीकाला अधिक वेळ थांबायला लावले. यावेळी सकाळी १० च्या सुमारास ऑफिसमध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. महिला लिपीकाने पतीसोबत भद्रावती पोलिस स्टेशन गाठत बुधवारी तक्रार दाखल केली. 

विनोद घुगूल याने या आधीही महिला लिपीकासोबत असे करण्याचा प्रयत्न केला असता पतीने असे न करण्याबाबत समजावून सांगितले असल्याचेही तक्रारीनंतर उघडकीस आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुरूवारी आरोपीस अटक करून जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे रवानगी केली आहे. घटनेचा पुढिल तपास भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस करीत आहेत.