पट्टेदार वाघाच्या हल्यात रत्नापूरातील गुराखी जखमी A cowherd in Ratnapur injured in the attack of a striped tiger

▫️वाघाची गावकरी जनतेत दहशत(Tiger terror among villagers)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 ऑगस्ट) :- रत्नापूर सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नवरगांव क्षेत्रातील रत्नापूर बीटात कक्ष क्र 4 4 येथे रत्नापूर येथील गुराखी आपले गाई बैल चरण्यासाठी घेवून गेलेला होता सदर गुराख्याचे नाव सुनिल सुधाकर नैताम राः रत्नापूर वय 3 5 वर्ष आहे.

दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने सुनिल नैताम याचे वर हल्ला चढविला आजुबाजुला असलेले गुराखी धावून आल्याने त्यांचे प्राण वाचले या हल्यात ते कीरकोळ जखमी असल्याची माहीती वनरक्षक यांनी दिली वनविभागांनी जखमी सुनिल नैताम याना ग्रामीण रुग्नालय सिदेवाही येथील दवाखाण्यात नेलेले आहे. हया घटनेने गावात वाघाची दहशत पसरली असून वनविभाग यांनी वाघाचा बदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.