अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल करू नका : रविंद्र शिंदे Don’t viral video of minor girl prostitution: Ravindra Shinde

▫️या प्रकरणी कुणीही व्हिडिओ वायरल केला असल्यास गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी; पोलीस विभागाकडे मागणी(If anyone has made the video viral in this matter, a case should be registered and strict action should be taken; Request to Police Department)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.8 ऑगस्ट) : – सोशल मीडिया वर वरोरा मधील एका अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ फिरत असून कोणत्याही अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढणे, इतरांना पाठवणे, साठवणे कायद्याने गुन्हा आहे. 

याबाबत शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी आवाहन केले आहे की, सदर व्हिडिओ ज्यांच्याकडे असेल त्यांनी सोशल मीडियावर कुणालाही पाठवू नये आणि मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करावा.

सर्व सामाजिक संस्था, समाजातील सर्व घटक तसेच सुजान भारतिय नागरीक, यांनी लक्ष देवून असा प्रकार रोखावा असेही या आवाहना दरम्यान रविंद्र शिंदे म्हणाले.

या प्रकरणी ज्या कुणी सदर खोडसाळ प्रकार करून सोशल मीडिया वर त्या अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल केला असेल, त्याच्यावर गुन्हा नोंदवून कड़क कारवाई करावी, असे रवींद्र शिंदे यांनी म्हटले आहे.

“एक अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ वायलर केलेला जो कुणीही व्यक्ती असो, ज्यांनी हा घाणेरडा प्रकार केला आहे, समाजाचे हित लक्षात घेता, एक सुजान नागरीक म्हणून यात कोणीही व्यक्ती असो यांचे विरोधात मी कायदेशीर तज्ञांचे मार्गदर्शन घेवुन  कारवाई करणार, भविष्यात असे प्रकाराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती नको”…… रविंद्र श्रीनिवास शिंदे