✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.3 ऑगस्ट) : – स्व. कै.निळकंठराव शिंदे संस्थापक, सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती (माजी आमदार) भद्रावती यांच्या प्रेरणेने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित, गूरूनगर चिचोर्डी स्थित, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज निःशुल्क स्कूल बस सेवा देण्याकरिता प्रा. डाॅ. विशाल शिंदे (सहसचिव) भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी विद्यालयात सुपूर्द करण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला प्रा.डाॅ. विशाल शिंदे सर, सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती प्राचार्य डाॅ. जयंत वानखेडे सर, मुख्याध्यापक शिंदे सर, ए.एम.देशमुख सर, एम.एस.ताजने सर, बोढे सर, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे सरांनी मुलांना बस वेळापत्रक तथा बसचे नियम समजून सांगितले तर प्रा.डाॅ. विशाल शिंदे सरांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले.
बाहेर गावावरुन ये-जा करणार्या मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा ही स्कूल बस विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोढे सरांनी केले तर पाहूण्यांच आभार श्री मुख्याध्यापक ताजने सरांनी मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
