वरोरा रुग्णालय येथे स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन Inauguration of Breastfeeding Week at Warora Hospital

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 ऑगस्ट) : दिनांक १आगष्ट २०२३ ला ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.या वर्षांची थिम स्तनपानाचे सक्षमीकरण नोकरदार पालकांसाठी एक बदल हे आहे.

या उद्घाटनाला मा .डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ,, डॉ हरियाना बालरोग तज्ज्ञ, श्री अलंकार मरसकोल्हे बाल विकास प्रकल्प अधिकारी,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका,सौ वैशाली पाचोरे ईनरव्हील क्लब अध्यक्ष,सौ निलिमा गूंडावार माजी अध्यक्ष ईनरव्हील हे होते.

सरस्वती मातेचे पुजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन मान्यवरांनी हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी स्तनपान विषयीं आपले मार्गदर्शन केले.स्तनपानात कुटुंबाचा सहभाग खूप जरुरीचे आहे हे विषेश सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सांगितले.

स्तनपानाची शपथ सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ यांनी दिली.सुत्रसंचालन करू सोनल घाग अधिपरिचारीका यांनी केले आभारप्रदर्शन सौ वंदना बुरिवार समुपदेशक यांनी केले.या कार्यक्रमांचे आयोजन डॉ खुजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी केले.

स्तनपानसंबधीत पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती त्याचा प्रचार व प्रसार करण्यात आले मैत्रीनी महीला मंडळ,भजन मंडळ, क्लब, सोसायटी यामध्ये प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी केले.

या कार्यक्रमाची जबाबदारी श्रीमती सरस्वतिताई कापटे परिसेवीका,सौ सुजाता जूनघरे अप,कूमारी प्रियंका सोनूले अप, सपना राठोड अप,कूंदा मडावी कक्षसेवक यांनी केली.या कार्यक्रमासाठी सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच लाभार्थी व नातेवाईक यांनी लाभ घेतला