✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon Bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.25 एप्रिल):- येथे मुस्लिम बांधव याचा महत्त्वाचा सन म्हणजे रमजान ईद असते.या रमजान ईद साठी गाव खेड्यातून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मेन रोड शेगाव बू येथील ईदगाह येथे एकत्रित येऊन मुस्लिम बांधवांचा पवित्र सन ईद-उल-फिज (रमजान ईद).साजरा करण्यात आला.
जामा मस्जिद शेगाव बू चे इमाम मोईन कादरी साहेब यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना नमाज अदा केली.तसेच पोलिस निरीक्षक श्री अविनाश मेश्राम ठाणेदार शेगाव बू यांच्या तर्फे ईद च्या आदल्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे भोजन देन्यात आले आणि ईद च्या पवित्र सणाच्या दिवशी नमाज अदा करतेवेळी ठाणेदार अविनाश मेश्राम साहेब, जाधव साहेब सर्व पोलिस अधिकारी यांनी नमाज साठी मोलाचे सहकार्य केले.
यामधे संपूर्ण मुस्लिम बांधव बशीर कुरेशी, शादाब शेख, अन्सार शेख, इर्शाद शेख, तनवीर शेख,वकील मौलाना, डॉ इस्माईल पठाण, मुजमिल शेख, शेरखान पठाण यांच्या सह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. शांत रित्या नमाज अदा करण्यात आली आणि सर्व मुस्लिम बांधव यांनी एका- मेकाला गळे मिळून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या….
