शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै हा वाढदिवस ‘जनसेवा दीन’ म्हणून दरवर्षी साजरा करू : रविंद्र शिंदे We will celebrate Shiv Sena chief Uddhav Balasaheb Thackeray’s birthday on July 27 as ‘Janseva Din’ every year: Ravindra Shinde

▫️शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनसेवा दिन म्हणून संपन्न(Shivna Party chief Uddhav Balasaheb Thackeray’s birthday celebrated as Public Service Day)

????शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांची सुरुवात(Shiv Sena party chief Uddhav Balasaheb Thackeray’s birthday social commitment)

????पुढील आठवडाभर चालणार विविध सामाजिक उपक्रम(Various social activities will be going on for the next week)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.27 जुलै) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै हा वाढदिवस ‘जनसेवा दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करू असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्यावेळी केले.

हिंदुद्ददयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना हा पक्ष समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जिवाचे रान केले. हिंदुद्ददयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संदेशाचा पाठपूरावा करीत पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. याच नीतीला पुढे चालवित शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी २७ जुलै हा पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस ‘जनसेवा दिवस’ म्हणून साजरा केला तर पुढील संपूर्ण आठवडा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

        यानिमित्याने पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. 

         वरोरा तालुक्यातील आमडी येथील वामन मारोती दुर्वेकर, आजणगाव येथील सुधाकर मारोती चट्टे, डोंगरगाव (रेल्वे) येथील कवडू शंकर बलकी, जीवन ज्योती दिव्यांग औद्योगिक कर्मशाळा येथील विद्यार्थी कुमारी कौशल्या गोकुळ गावत, मंगेश कोडापे या दीव्यांग बांधवांना पाच चाकी सायकल वाटप करण्यात आली. 

         गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय येथे केक कापून तथा सहभोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

         तर याप्रसंगी रविंद्र शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होवून वरोरा येथील विशाल बडवे व भाजपातून समीर खाण शकील खाण, यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. 

           दि. २७ जुलै रोजी व पुढील आठवडाभर वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षाच्या वरोरा येथील “शिवालय”मध्यवर्ती कार्यालयातून सर्व कार्यक्रमांचे नियोजन पार पडत आहे.

         पुढील आठवडाभर वैद्यकीय आर्थिक सहकार्य, कर्णबधिरांना श्रवण यंत्र वाटप, शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, बचत गट महिलांना व बेरोजगारांना मार्गदर्शन व पूरग्रस्त भागात पीडितांना मदत करण्यात येत आहे. व दिव्यागांनाचे, वैदकिय मदत, शालेय पुस्तक मदत ईत्यादी करीता नावे नोंदणी सुरु आहे.

तसेच मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी अतिवृष्टीमुळे सतर्कतेच्या इशारा दिला असल्याने व तशी परिस्थिती निर्माण होत असल्याने आप आपल्या भागातील पूरग्रस्तांच्यी मदतीसाठी शिवालय शिवसेना(उबाठा) वरोरा -भद्रावती विधानसभा मध्यवर्ती कार्यालय कडुन व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिबल रविंद्र शिंदे चॅारिटेबल ट्रस्ट चंद्रपुर यांचे संयुक्त विद्यमानाने तात्काळ मदत करण्यात येईल तसेच वेळप्रसंगी शासकिय आदेश प्राप्त होताच मा. तहसीलदार, पोलिस विभाग वरोरा भद्रावती यांचे मार्गदर्शनात सुध्दा आपल्या मदत पुरवावी लागेल. तरी सर्व शिवसैनिक, युवा-युवती सैनिक, महीला संघटीका व ट्रस्ट कायॅवाहक यांनी सतर्क राहावे लवकरचं शिवसेना(उबाठा) हेल्पलाईन नबंर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

         याप्रसंगी श्रीमती सुषमाताई शिंदे, युवासेनेचे पूर्व विदर्भ विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे, जिल्हा महिला आघाडी संघटीका सौ. नर्मदाताई बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहरप्रमुख घनश्याम आस्वले, आश्लेषा जीवतोडे, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, विधानसभा समन्वयक वैभव डहाने, वरोरा-चिमुर-ब्रम्हपुरीच्या युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा माडंवकर.

प्रा. प्रीती पोहाणे, प्रतिभा मांडवकर, अभिजीत कुडे, निखिल, मांडवकर, अनिल सिंग, शुभांगी डाखरे, स्वाती ठेंगणे, चंदू जीवतोडे, मंगेश भोयर, सृजन मांढरे, युवराज इंगळे, तेजस्विनी चंदनखेडे, ज्योती पोयाम, शिव गुडमल, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, स्नेहा किन्नाके, भावना खोब्रागडे, महेश निखाडे, मनोज पापडे, प्रज्वल जाणवे, सौरभ खापने, निखिल मांडवकर, राहूल मालेकर आणि गौरव नागपुरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते.

“वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात युवक युवती सेनेच कार्य उत्तम सुरू आहे. अल्पावधित रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, युवक, युवती यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेला घराघरात व मनामनात नेल. भविष्यात विद्यार्थ्यांपर्यंत गोंडवाना विद्यापीठाचे शैक्षणिक उपक्रम राबवू व येथील विद्यार्थी, युवक, युवती, यांना सर्व दृष्टिकोनातून सक्षम बनवू.”

– प्रा. निलेश बेलखेडे विभागीय सचिव युवासेना (पूर्व विदर्भ)