बापरे बाप . ट्रक – बस ची धडक..  नागपूर – नागभीड मार्गावरची घटना Dad Truck-bus collision.. Incident on Nagpur – Nagbhid route

▫️प्रवाशांसह,चालक,वाहक जख्मी(including passenger, driver, carrier injured)

✒️ चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .1 सप्टेंबर) :- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवखळा गावाच्या पुढे एक कि.मी.अंतरावर नागभीड-नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारला सकाळी आठ वाजता बस -ट्रकची आमोरा-सामोर धडक झाल्याची घटना घडली.त्यात प्रवाशांसह बस चालक,वाहक जख्मी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी आगाराहुन  बस क्रमांक एम.एच.१३सी.यु ८३३७ ही बस अमरावती कडे जात असताना.नागपुर कडुन नागभीड कडे ट्रक येत होता.नवखळा या गावाच्या एक कि.मी अंतरावर नागभीड-नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर या बस व ट्रकची आमोरा-सामोर धडक झाली. त्यात प्रवाशांसह चालक,वाहक हे जख्मी झाले.त्यांना प्राथमिक उपचारा साठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बस रोडच्या मधात फसल्याने रोडवरील वाहतूक अर्धा तास बंद होती.रोडच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.ट्रक मधील चालक हा जख्मी झाला आहे.या घटनेची माहिती नागभीड पोलिस स्टेशनला देण्यात आली पोलिस घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला.पुढील तपास करीत आहेत.