सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22 जानेवारी) :- वणी तालुक्यातील मौजा शिंदोला, कुरई, परमडोह व येनक येथे अदानी फाउंडेशन ( चांदा सिमेंट वर्क्स) पुरस्कृत सेंद्रिय व जैविक शेती विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १४ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर घेण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जैविक खते ( गांडूळ खत, कंपोस्ट खत) व जैविक कीटकनाशके ( निमास्त्र, जिवामॄत, दशपर्णी अर्क बिजामॄत) कसी तयार करायचे याविषयी प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण कार्यक्रम मार्फत घरच्या घरी तयार करायचे येईल व त्याचा वापर केल्यामुळे शेती ची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. मानवी आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल. तसेच स्वयंसहाय्यता गटांना उद्योगाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.

या प्रशिक्षणाचा २४५ महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून सुमित्रा देवी, सुरेशकुमार ( अदानी सिमेंट, टिकारीया. यु. पी) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अदानी फाउंडेशन चे कुणाल तडस ( व्यवस्थापक) वैशाली गुळघाने ( सहा. व्यवस्थापक) बाएफ संस्थेचे गुरुदास गिरी ( प्रकल्प अधिकारी) सुरज देवगडे, रूपेश कुकडे, स्वाती झाडे (सरपंच कुरई) विजुभाऊ ठाकरे (उपसरपंच कुरई) वाभिटकर ( सरपंच परमडोह) कल्पना टोंगे (सरपंच येनक) अनिल गारघाटे ( उपसरपंच येनक) कलावती मोहीतकर ( उमेद व्यवस्थापक) सुमित दहिकर (दिलासा) अदानी फाउंडेशन चे स्वयंसेवक संतोष झाडे, कल्याणी खामनकर, तसेच स्वयंसहाय्यता गटाच्या समस्त महिला यांनी सहकार्य केले.