मा.श्री. हंसराजजी अहीर यांनी घेतले भटाळा येथील शिव मंदिराचे दर्शन 

✒️ आम्रपाली गाठले (शेगाव बू प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील भटाळायेथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे भरल्या जाणाऱ्या 3 दिवसीय जत्रेला *राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर* यांनी भेट दिली व हेमाडपंथी शिवमंदीरात दर्शन घेतले.

या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. जांभुळे आणि डॉ. सावसाकडे यांच्याशी चर्चा करीत हिमोग्लोबिनोपॅथी, सिकलसेल ॲनेमिया, ब्लडप्रेशर, शुगर संबंधी आजारी असलेल्या रुग्णांची माहीती घेत या शिबिराचा अहवाल गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवावे अशा सुचना श्री. अहीर यांनी केल्या.

यावेळी माजी जि. प. अर्थ व बांधकाम सभापती राजु गायकवाड, पंचायत समिती सदस्य वंदनाताई दाते, ग्रा. पं. सदस्य अनंता मगरे, मानिकराव जांभुळे, रवि कांबळे, मनोज चौधरी, अनिल चौधरी, करण भुसारी, गणेश कुटे, राहुल ढवस, वैभव बोढे, जगदीशप गाडगे, कालिदास ढोक, रुपेश गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते.