एक हात मदतीचा A helping hand

72

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.12 जुलै) :- यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी श्री महेश जी सिडाम हे उदरनिर्वाह करिता भद्रावती तालुका येथील नंदोरी येथे वास्तव्यास आहे असता त्यांची भेट अचानक नंदोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच तथा शिवसेना भद्रावती वरोरा विधानसभा संघटक मंगेश भोयर यांच्या शी झाली असता.

त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची चर्चा निघाली, व मंगेश जी भोयर यांच्या मार्गदर्शनात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय नंदोरी येथील मुख्यध्यापिका अश्लेषा जीवतोडे भोयर यांनी त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या शाळेत इयत्ता 9 वी मध्ये दाखल केले.

वरील विद्यार्थ्यांच्या पालकाची आर्थिक बाजू हलाखीची आहे हे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख श्री.रवी भाऊ शिंदे यांना कळताच त्यांनी श्रीनिवास चॅरिटेबल ट्रेस्ट तर्फे त्या विद्यार्थ्याकरिता शालेय दप्तर, नोट बुक, कन्पॉस, पेन, पेन्सिल ई शालेय साहित्य देऊ केले.

हे साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरील आनंद समाधानकारक होता.

शिवसेना शिवालय मध्यवर्ती कार्यालय वरोरा येथे त्या विद्यार्थ्याला धनराज जी आस्वले, दत्ता भाऊ बोरकर, नंदू पठाल, प्रशांत कारेकर, अश्लेषा जीवतोडे भोयर, प्रीती पोहाणे, अभिजित कुडे, निखिल मांडवकर, युवराज इंगळे यांच्या उपस्थितत देण्यात आले.