बापरे… स्टेट बँकेत दरोडा 

🔹१४ लाख रुपये लंपास

✒️चंद्रपूर (chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 फेब्रुवारी) :- तालुक्यातील एमआयडीसी (पडोली )येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची चंद्रपूर -घुग्घूस मार्गावर शाखा असून या शाखेत सुरक्षा रक्षक आहे.शनिवार व रविवार बँकेला सुटी होती यामुळे बँक दोन दिवस बंद होती .

याच संधीचा चोरट्यानी फायदा घेऊन शनिवार किंवा रविवार या दोन दिवसापैकी चोरट्यानी बँक फोडली व बँकेचे लॉकर तोडून त्यामध्ये असलेली 14 लक्ष रुपयाची रोकड पळविली ही घटना आज सोमवारला सकाळी बँक उघडल्यानंतर उघडकीस आली यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यात खळबळ उडाली. व या घटनेची माहिती पडोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी बँकेत जाऊन बँकेतील सिसिटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले असून लवकरच पोलीस आरोपीला बेड्या ठोकणार आहे.