✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.6 जुलै) :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थीना बस वेळवर येत नसल्याने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या नेतृत्वात आगार व्यस्थापक वरोरा येथे बस वेळेवर येण्या संदर्भात निवेदन दिले त्यावेळी आगार व्यवस्थापक यांनी आढावा घेऊन महावितरण ला सूचना देऊन अवघ्या 9 तासात बस सेवा सुरु केली.
दोन दिवसा अगोदर भर पावसात भिजलेले विद्यार्थी आक्रोश व सामान्य जनतेसाठी साठी ग्रामीण भागातील युवानेतृत्व गणेश चिडे यांनी आगार व्यस्थापक यांना मुद्देशीर माहिती देऊन बस सेवा सुरु करण्यात मदत केली. तसेच वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील कोणतेही शालेय बस वेळवर पोहचलीच पाहिजे व विद्यार्थीचे वेळेअभावी नुकसान कोणत्याचा प्रकारचे झाली नाही पाहिजे.
यांची महामंडळ ने दखल घ्यावी तसेच महामंडळ आगार व्यस्थापक वर्धेकर साहब व महावितरण इंजिनीर पिजदूरकर साहेब यांनि निवेदनात विद्यार्थीची अडचण लवकरात लवकर समजून घेतल्याबद्दल व शिवसेना युवासेना च्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना जे काही सहकार्य केले त्यांचे सुद्धा शालेय विद्यार्थी यांनी आभार व्यक्त केले.
कोणत्याही विद्यार्थीना बस संदर्भात अडचण असल्यास आगार व्यवस्थापक ला योग्य वेळी सूचना देऊन प्रश्न मार्गी लावावा अशे मत गणेश चिडे यांनी व्यक्त केले.
