भाजपचा गड धानोरकरांनी जिंकला Dhanorkar won the stronghold of BJP

🔸पोंभुर्णा बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता( Maha Vikas Aghadi power over Pombhurna Bazar Committee)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.2 मे) :- जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. शनिवारला नऊ बाजार समितीचा निकाल हातात आला. या निकालाने जिल्ह्यातील काही नेत्यांना मोठा धक्का दिला. आज जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील बाजार समितीची मतमोजणी पार पडली. भाजपाचे क्षेत्र असलेल्या पोंभुर्ण्यात महाविकास आघाडीने मोठे यश मिळविले. भाजपा समर्थित शेतकरी आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.

केवळ सहा जागा त्यांना जिंकता आल्या. तर महाविकास विकास आघाडी समर्थित पॅनलला मोठे यश मिळाले आहे. बारा जागेवर विजय मिळवीत बाजार समितीची सत्ता काबीज केली आहे. पोभुर्णा येथील पराभव भाजपासाठी मोठा धक्का असल्याच बोललं जातं आहे. ही निवडणूक खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात लढविली गेली होती.

चंद्रपूर जिल्हातील बारा बाजार समितीसाठी निवडणूका पार पडल्या. नऊ बाजार समितीचा निकाल रविवारला जाहीर झाला होता. यात चार बाजार समितीवर काँग्रसने विजय मिळवीला तर दोन बाजार समितीवर भाजप विजयी झाला. दोन ठिकाणी भाजप-काँग्रेस युतीने विजय मिळवीला. आज ( रविवार ) जिल्हातील पोंभुर्णा बाजार समितीची मतमोजणी झाली.

पोंभुर्णा येथील निकाल धक्कादायक ठरला. पोंभुर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविलं. महाविकास आघाडी समर्पित पॅनलला बारा जागावर विजय मिळाला. तर भाजप समर्पित पॅनलला केवळ सहा जागावर विजय मिळवीता आला आहे.

आज चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे खासदार बाळू धानोरकर यांनी विजयी उमेदवारांच्या सत्कार केला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी मरपल्लीवार, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, काँग्रेस नेते विलास मोगरकर, आदिवासी नेते जगन येलके, आशिष कावरवार, वासुदेव पाल, वसंत पोरे, अशोक साखलवार, प्रफुल लांडे, प्रवीण पिदूरकर, विनोद थेरे, विनायक बुरांडे, भारती बदन, सुनंदा गोहणे, वसंत मोरे, दर्शन शेडमाके, आशिष अहिरकर, किरण पोहनकर, पंकज पुल्लावार, पुरुषोत्तम वासेकर, विजय गुरनुले यांची उपस्थिती होती.