खासदार धानोरकर यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व हरपले Due to the death of MP Dhanorkar, the brave, fighting and strong leadership of Chandrapur district has been lost

🔸शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांची प्रतिक्रिया(Shiv Sena district chief Mukesh Jivtode’s reaction

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.30 मे) :- धाडसी माणूस भीत नाही आणि आणि भिणारा माणूस धाडस करित नाही. परंतु धाडस केल्याशिवाय कोणालास काही मिळत नाही हे निर्विवाद सत्य आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे त्यापैकीच एक होते .चंद्रपूर जिल्ह्याचे धाडसी, लढाऊ व खंबीर नेतृत्व युवा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या मृत्युने हरपले आणि चंद्रपूर जिल्हा पोरका झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनावर दिली आहे. 

 चंद्रपूर जिल्ह्यातील भारदस्त लढाऊ युवा उंमद व्यक्तिमत्व ,राजकारणातील अभिमन्यू , विकास कामाला गती देण्यासाठी सदैव कुठल्याही पातळीवर सक्षम नेतृत्वासी दोन हात करण्यास तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर या युवा नेतृत्वाला चंद्रपूर जिल्हा आता पोरका झाला आहे . असं राजकारणातील नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा होणे नाही.

या शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आपल्या शोक संदेश पर भावना व्यक्त केल्या आहेत.