चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात असे भारदस्त युवा नेतृत्व बाळूभाऊ धानोरकर पुन्हा लाभणे कठीण.. रवींद्र तीरानिक Such a high profile in the politics of Chandrapur district Youth leadership Balubhau Dhanorkar difficult to gain again..Ravindra Tiranik

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.30 मे) :- लढाऊ खंबीर नेतृत्व युवा खासदार बा धानोरकर यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्हा पोरका झालाय…

 चंद्रपूर जिल्ह्यातील भारदस्त लढाऊ युवा उंमद व्यक्तिमत्व ,राजकारणातील अभिमन्यू ,विकास कामाला गती देण्यासाठी सदैव कुठल्याही पातळीवर सक्षम नेतृत्वासी दोन हात लढण्यास तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर या युवा नेतृत्वाला चंद्रपूर जिल्हा आता पोरका झाला आहे . असं राजकारणातील नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला पुन्हा न होणे आहे.

या शब्दात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख, जनमंच सदस्य नागपूर, चंद्रपूर कलाअकादमीचे संचालक , अंनिस महाराष्ट्र सल्लागार-मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांनी आपल्या शोक संदेश पर भावना व्यक्त केल्या आहेत.