१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा अवचित साधून मसाला भात वाटप व भव्य मिरवणुकीचे स्वागत 1st May Maharashtra Day and Labor Day celebration with masala rice distribution and grand procession

✒️उमेश तपासे चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.2 मे ) :- सोमवार दिनांक 1 मे रोजी कामगार दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभा यात्रेचे आयोजना निमित्त बँक ऑफ इंडिया जवळ मैन रोड या ठिकाणी मसाला भात वाटप व मिरवणुकीचे स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

शोभा यात्रेचे स्वागत व मसाला भात वाटपचे आयोजन चिराग नथवानी, सलीम शेख, जुनेद शेख, उमेश तपासे,अनिस गिलानी, मनीष रायकुडलिया, अमित पुरोहित,दिलीप वाघमारे,स्वप्नील मुरस्कार,अनिकेत शेंडे यांनी केले.

या शोभायात्रेत व मसाला भात वाटपाचा पेंडलला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी चिराग नथवानी, सलीम शेख, जुनेद शेख, यांनी खासदार बाळू धानोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार बाळू धानोरकर यांनी शोभा यात्रेत शामिल असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच शोभायात्रा बघणाऱ्या लोकांना स्वतःच्या हातानी मसाला भात वाटप केला.

1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आली.

ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गातून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता करण्यात येणार होती याच निमित्ताने शहरातील काही व्यापारी वर्ग व समाजसेवक यांनी या रॅली मधील सहभाग घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासता रॅली चे स्वागत तथा मसाला भात वाटप चा कार्यक्रमाचे आयोजन करून आपले सामाजिक दायित्व निभवले.