गरजू कुटुंबांना युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या हस्ते खाद्य तेलाचे वाटप Distribution of edible oil to needy families by Yuva Congress leader Diwakar Nikure

✒️ रामदास ठूसे चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर (दि. 22 एप्रिल) :-   

         चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चिमूर येथील आधार बगल्यावर तालुक्यातील काजळसर येथील अनिल उद्धव गावतुरे,जामगाव येथील अमोल नामदेव गायकवाड,गोरवट येथील सदाशिव चौधरी,जगदीश दोडके,कोटगाव येथील सूरज धनराज धारने.

मिलिंद लहुजी धारने,अडेगाव येथील जगदीश कोवे,काजळसर येथील संजय गोविंदा सामूसाकडे,भिवा खटु डहारे ,महादेव धनाजी खामदेवे,रमेश हटवादे,विहीरगाव येथील सुरेश देवाजी जिवतोडे,जामगाव येथील चरणदास सखाराम चुनरकर,लाव्हारी येथील रमेश किरीमकर या कुटुंबांना खाद्यतेलाचे वाटप करण्यात आले.

या वेळेस माजी जि.प.सदस्य मा.गजानन बुटके,युवक काँग्रेस जिल्हा महासचिव मा.गौतम पाटील,युवक काँग्रेस माजी जिल्हा उपाध्यक्ष पारस नागरे,सुधीर पंदिलवार,गोविंद दाणे,मा.किशोर शिवरकर आदी उपस्थित होते.