🔸 तालूका कार्यकारीणी गठीत
✒️ चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर (दि.25 एप्रिल) :-
शिक्षकांवर झालेल्या अन्याय अत्याचार व समस्यांना वाचा फोडने हा उद्देश ठेवून प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ तालूका शाखा चिमूर ची सह विचार सभा वडाळा चिमूर येथील लुंबिनी बुद्ध विहारात रविवार ला पार पडली.
यावेळी सहविचार सभेचे अध्यक्ष मारोती पाटील प्रमुख मार्गदर्शक संजय बोधे अरुण गायकवाड मनोज वनकर गुलाब बागेसर मनोज वनकर हेमराज नंदेश्वर आदी उपस्थीत होते. उपस्थीत मान्यवरांनी सहविचार सभेदरम्यान मार्गदर्शन केले. दरम्यान चिमूर तालुका प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ यांची कार्यकारिनी गठीत करन्यात आली.
चिमूर तालुका प्रजासत्ताक कर्मचारी संघ अध्यक्ष म्हणून के एन शेंडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष रामदास कामडी, कायध्यक्ष दिपंकर धोटे, सचिव विलास गजभिये, सहसचिव विलास शंभरकर, कोषाध्यक्ष युवराज मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख पि डी रामटेके, संघटक गोंडाणे, सोनुले, सोमेश्वर रामटेके, महिला प्रतिनीधी वैशाली अलोने, मार्गदर्शक अरुण गायकवाड, सदस्य प्रभाकर दडमल, खोब्रागडे, संजिबो वानखेडे, मनिष निखाडे आदीची निवड करण्यात आली. सहविचार सभेला बहुसंख्य शिक्षक उपस्थीत होते.
