खाजगी ट्रॅव्हल्स- ट्रक अपघातात अनेकजन जखमी Private Travels- Many injured in truck accident

2322

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.23 एप्रिल) :-

      चंद्रपूर – नागपूर महामार्गांवरील वरोरा जवळ ट्रॅव्हल्स- ट्रक अपघातात अनेकजन जखमी झाले आहे. 

वृत्त असे की, चंद्रपूर – नागपूर महामार्गांवर वरोरा जवळ नंदोरी टोल नाका नवीन उड्डाणं पुलाजवळ २:३० वाजता च्या सुमारास नागपूर ला जात असलेल्या DNR ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. ३४ बी एच ७५७७ तर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एम.एच. ३४ ए बी ३८४० ला धडक दिली.

यात अनेक प्रवासी व चालक जखमी झाल्याचे कळले आहे तर ट्रॅव्हल्स चा समोर चा भाग चेंदमेंदा झाला. त्वरित जखमींना प्रवाशांना उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींची नावे वृत्त लिहीपर्यंत कळले नाही. पुढील तपास वरोरा पोलीस करित आहे.