Home चंद्रपूर राळेगाव रेती घाटात निर्धारित उत्खननापेक्षा जास्त रेती उत्खनन Excavation of sand in excess of prescribed excavation in Ralegaon Sand Ghat

राळेगाव रेती घाटात निर्धारित उत्खननापेक्षा जास्त रेती उत्खनन Excavation of sand in excess of prescribed excavation in Ralegaon Sand Ghat

0
राळेगाव रेती घाटात निर्धारित उत्खननापेक्षा जास्त रेती उत्खनन  Excavation of sand in excess of prescribed excavation in Ralegaon Sand Ghat

?रेती घाट मालकासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा (File a criminal case against the concerned officials including the sand wharf owner)

✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.23 एप्रिल) :-  

          तालुक्यातील राळेगाव रीट येथील रेती घाटावर निर्धारित उत्खनापेक्षा जास्त रेती उत्खनन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी विभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांनी या घाटावर धाड टाकून मशनरी पोक लॅन जप्त केली. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून मर्यादेपेक्षा जास्त रेतीसाठा काढल्यामुळे या रेती घाटमालकासह संबंधित अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार डॉ. नरेंद्र दाते यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

मौजा राळेगाव रेतीघाट हे लीलावाव्दारे बी. के. इंटरप्राईजेस प्रो. प्रा.शुभम चांभारे यांना निर्धारित लांबी १५०० मीटर, रुंदी ३० मीटर, खाली o.४० मीटर, क्षेत्रफळ आराजी ४.५ हेक्टर आर एवढ्या क्षेत्रामध्ये उत्खनन करण्याची परवानगी शासनाने दिली होती. बीके इंटरप्राईजेस यांना ३ हजार तीनशे साठ ब्रास एवढे रेती उत्खनन करण्याची मंजुरी मिळाली होती तरी सुद्धा त्यांनी जवळपास ५o हजार ब्रास रेती उत्करन केल्याचा आरोप डॉ. नरेंद्र दाते यांनी केला आहे.

नियमा नुसार रेती उत्खनन मजुराव्दारे ट्रॅक्टर नी डेपोपर्यंत रेती वाहतूक करण्याची परवानगी आहे परंतु यांनी पोकलेन सारख्या मोठ्या मशनरी चा वापर करून टिप्पर द्वारे रेतीची वाहतूक केली आहे, आठ ते दहा फुटापर्यंत खोल गड्डे केले आहे, रॅम्प बनवून रेती साठवणूक केली आहे.

सभोवतालच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम अटीचे पालन करण्यात आले नाही तसेच या चाललेल्या प्रकाराकडे तहसीलदार भद्रावती उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी यांना माहिती असून यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडाला आहे. या रेतीघाटाची सखोल चौकशी करून मोजमाप करण्यात यावे व दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार डॉ. नरेंद्र दाते यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here