२२ -२३ रोजी लायरीड उल्कावर्षाव दिसणार The Lyrid meteor shower will be visible on the 22nd-23rd

322

🔹२९एप्रिल पर्यंत लायरीड उल्कावर्षाव दिसणार,२२-२३ एप्रिल ला संख्या सर्वाधिक

✒️उमेश तपासे चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.22 एप्रिल) :-

       दरवर्षी २२,२३ एप्रिल रोजी चांगला दिसणारा लायरीड उल्कावर्षाव (Lyrid Meteor Shower ) ह्या वर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे.एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा (lyra)तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वाच गृप चे अध्यक्ष,प्रा सुरेश चोपणे ह्यानी दिली.

       उत्तर-पूर्ण दिशेला सूर्य मावळल्या नंतर लायरा तारा समूहात वेगा(Vega) ताऱ्याजवळ हा उल्कावर्षांव पाहता येईल .रात्री १०.३० वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत हा चांगला दिसू शकेल.ह्या वर्षो ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकेल असा अंदाज आहे.

       हा उल्कावर्षाव थ्याचर (Thatcher) ह्या धूमकेतू मुळे दिसतो.१८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळुन गेला होता तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे.पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खुप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे.हा धूमकेतू पुन्हा २४५ वर्षाने म्हणजे २२७८ सालामध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.तेव्हा उलकांचा जणू पाऊस पडल्या सारखा दिसेल.

     ह्या धूमकेतूचा ( C १८६१/G1) शोध अमेरिकेतील अल्फ़्रेंड थ्याचर ह्यानी ५/४/१८६१ मध्ये लावला.परंतु गेल्या २५०० वर्षांपासून प्राचीन लोकांना हा उल्कावर्षाव पाहिला आहे.चिनी लोकांनी इ सन पूर्व ६८७ मध्ये हा उल्कावर्षाव पाहिल्याची नोंद आहे.

         निरीक्षण कसे करावे

उल्कावर्षाव दुर्बिणीतून दिसत नाही,लहान (१०-× ५०)आकाराची द्विनेत्रीं असेल तर चांगले.अंधाऱ्या रात्री जमिनीवर लेटून आकाशात पाहिल्यास अतिशय उत्तम पद्धतीने उल्का वर्षाव निरीक्षण करता येते.सर्व खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमींनी हा उल्कावर्षाव पहावा.पडता तारा (उल्का) पाहिल्यास आपली कोणतीहि इच्छा पूर्ण होते ही अंधश्रद्धा आहे.

प्रा सुरेश चोपणे,चंद्रपुर

अध्यक्ष-स्काय वाच गृप