सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची या मॉडेलिंग शो चे पुणे येथे 23 एप्रिल ला ऑडिशन Soundaryakanya Mi Maharashtrachi and Saubhagavati Mi Maharashtrachi will audition for this modeling show on 23rd April in Pune

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.21 एप्रिल) :-

 सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची व राजकुमारी मी महाराष्ट्राची आणि राजकुमार मी महाराष्ट्राचा या शो चे रविवार दि.23 एप्रिल ला छ. शिवाजीनगर पुणे येथे ऑडिशन आयोजित करण्यात आले आहे असे रॉयल ग्रुप चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मिस.मिसेस.किड्स असे या ऑडिशन चे स्वरुप आहे. पुणे मध्ये प्रथमच महाराष्ट्रकरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याचे सपोर्टिंग पार्टनर नमिता ताई पाटील यांनी सांगितले. पुणे मध्ये मराठमोळा लूक चे सादरीकरण केले जाईल.

रॉयल ने पुणे मधील महिला आणि युवतींना एक रॉयल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.या ऑडिशन साठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे रॉयल ब्रँड अम्बेसिडर रेणुकाताई ठाणगे यांनी आवाहन केले. ऑडिशन मध्ये 3 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील सर्वाना सहभागी होता येणार आहे.

हे ऑडिशन रविवार दि. 23 एप्रिल रोजी फिट बिट्स स्टुडिओ प्राईड हॉटेल जवळ शिवाजीनगर पुणे मध्ये सकाळी 10 ते 2 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शो साठी सर्व जिल्ह्या मधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या ऑडिशन मध्ये सहभागी व्हावे असे कोकण ब्रँड अम्बेसिडर सौभाग्यवती विजेती दर्शना पाटील यांनी आवाहन केले आहे. ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 / 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा .

या ऑडिशन साठी आकाश रणदिवे, मॉडेल विद्या सुर्यवंशी, डॉ.स्नेहा लोंढे, युवाक्षी पाटील, श्वेता धामापूरकर , माधवी व्यवहारे, मॉडेल श्रद्धा दराडे, मॉडेल मोहिनी धोंगडे, शोभा आढाव, वैष्णवी काळे , मॉडेल मोहिनी चव्हाण, सुप्रिया खरात, मॉडेल निशा फुलसौंदर,मॉडेल अश्विनी गिरे,पत्रकार प्रकाश यादव, मॉडेल तेजल मुनेश्वर,मॉडेल श्रावणी क्षिरसागर, सागर पवार, ज्योती खिलारे, हर्षाली शिरसाळे, अभिनेत्री पायल बाविस्कर .दै पुणे वैभव चे संचालक श्री विजय जगताप ,श्री मनोहर भावसार सर पञकार,सुनिल भोसले,जावेद शेख ,दिनेश चौधरी, सितारा महिला बचतगट अध्यक्षा आयेशा तांबोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.