🔹पोकलांड मशीन वर जप्तीची कारवाई नदीपात्रात मोजमाप करून संपूर्ण महसूल मशीन मालकाकडून वसूल करण्याची नागरिकांची मागणी
✒️रामदास ठुसे चिमूर(Chimur प्रतिनिधी)
चिमूर (दि.21 एप्रिल) : –
चिमूर तालुक्यामध्ये रेती तस्करांनी हौदस घातलेला असून नुकतेच पिपर्डा व शिरपूर घाटावर रेती तस्करीच्या घटना ज्वलंत असतानाच काल दिनाक 19 च्या रात्री गोरवट गावाजवळील गोदनी नदी घाटावर होत असलेल्या रेती तस्करीला आळ घालण्याकरिता गावकरी वर्गाने कंबर कसून घाटावर पोहचताच गावकरी व रेती तस्कारांत हमरीतुमरी झाली.
यानंतर रेती तस्करांनी गावकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांनी माघार न घेता नदी पत्रात असलेल्या पोकलांड मशीन ला घेराव घालून मशीनला नदिबहेर येऊच दिले नाही. यासाठी गावकऱ्यांनी रेती तस्करांशी 2 तास लढा दिला. महसूल विभागाला माहिती देऊनही तब्बल अधिकाऱ्यांना पोहचण्यास 1 तास उशीर झाला त्यामुळे नागरिकांनी त्याचेवर सुधा शंका उपस्थित केली आहे. सदर मशीनचा पंचनामा करून जप्तीची कारवाई करण्यात आले आहे.
सदर गोरवट येथील गोदनी नदी घाटावर मागील 3 दिवसांपासून रेती तस्करांनी जोमात रेती तस्करी सुरू केली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्कर हे 1 पोकलांड मशीन व अंदाजे 40 ते 50 हायवा 10 चाकी ट्रॅक च्या साहाय्याने रेती तस्करी जोमात करीत होते.
गावकऱ्यांना याबाबत कल्पना आलेली होती मात्र सदर घाट लिलाव झाला असल्याचा खोटा बनाव करून रेती तस्करांनी गावकऱ्यांची फसवणूक केली. याची खरी माहिती गावकऱ्यांना माहिती होताच महसूल अधिकऱ्यांना माहिती देऊनही त्यांचेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी स्वतः चंग बांधून संपूर्ण गावणे एक मत करून आया बाया सहित पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हातात स्वतःच्या रक्षणासाठी हातात काठी घेऊन नदी पात्र गाठले.
सरळ गावकरी नदीपात्रात जाताच तिथेच रेती वाहतूक करणारे वाहन नदी पात्रातून पसार झाले. मात्र गावकऱ्यांनी रेती उपसा करणाऱ्या पोकलांड मशीनला घेराव घातला. यावेळी रेती तस्कर व गावकऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाली. परंतु पोकलांड चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने अनेकदा मशीन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी पोकलांड चालकाला चांगला दम देताच त्यानेही तिथून पळ काढला.
सदर प्रकरणात रेती तस्कर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्या तस्करांपैकी 3-4 रेती तस्कर गावकऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करीत होते . परंतु गावकऱ्यांनी पैशाला महत्व न देता मशीन ला बाहेर येऊ दिले नाही.अशी माहिती गावकऱ्यानी प्रतिनिधी सी बोलताना दिली .
1 तास अशिरा का होईना मात्र महसूल प्रशासन जागे झाले.आणि घटनास्थळी पोलिस प्रशासनासहित दाखल झालेत. पोलिस व महसूल प्रशासन येताच रेती तस्करांनी धूम ठोकली. परंतु पोकलांड मशीन गावकऱ्यांच्या मदतीने जप्त करण्यात महसूल प्रशासनानंल यश आले. सदर कारवाई रात्रौ 11 वाजता करण्यात आली
सदर पोकलांड मशीनचा पंचनामा करून पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आली. सदर कारवाही ही चिमूर उपविभागीय अधिकारी संकपाळ यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार प्राजक्ता बुरांडे, तलाठी ठाकरे, कांमडे तसेच पोलिस प्रशासन चे उपनिरीक्षक जांभूळे आणि त्यांची संपूर्ण सहकारी यांनी कारवाई केली.
चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत रेती तस्करी होत असताना मात्र अधिकाऱ्यानं जाणीव नसल्यासारख देखावा अधिकाऱ्यांकडून पहावयास मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन रेती तस्करी थांबावी अशी मागणी नागरिकांनी केलेली असून रेती तस्करी न थांबल्यास मशिनरी सुद्धा जागेवरच जाळण्यात येतील अशी तंबी नागरिकांनी तहसिलदार व प्रशासनसामोरं दिलीआहे.
सदर रेती तस्कर हे राजकीय पक्षचे मोठे आसामी असून दिवस पांढरे कपडे घालून लोकांना ज्ञान वाटतात तर रात्रीला काळे तोंड करून रेतीची तस्करी करतात असे गावकरी खुलेआम ठासून सागीत आहेत त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लक्तरे ऐरणीवर टांगली जात आहे राजकारणी आणि अधिकारी यांची साठ गाठ तर नाहीना अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे .
सदर करवाईमध्ये 40 ते 50 ट्रकच्या साह्याने लाखो रुपयांची रेतीची तस्करी झाली आहे तेव्हा सदर नदिघाटातील रेतीच्या खोदकामाची व गड्याचे मोजमाप करून या पोकलांड मशिन मालकावर दंड बसविणे गरजेचे होते मात्र लोकं समोर सादर मोजमाप झालेच नसल्याने अधिकारी हे तस्करीला खतपाणी घालत आहेत असा संशय नागरिकांनी व्यक्त केलेला आहे.
कारवाई बाबत तहसिलदार यांना कॉल केला असता तहसिलदार यांनी प्रतिसाद दिला नाही.
