रविवारला झोपडपट्टी विकास संघटनेतर्फे भद्रावतीत विविध कार्यक्रम Various programs in Bhadravati by Slum Development Association on Sunday

Share News

✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.21 एप्रिल) -: 

          विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी विकास संघटना महाराष्ट्र राज्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती पंचशील नगर यांच्यावतीने एक दिवसीय विविध कार्यक्रम पंचशील बुद्ध विहाराच्या पटांगणावर आयोजन करण्यात येणार आहे.

 रविवारला दुपारी तीन वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन अध्यक्ष झोपडपट्टी विकास संघटना राहुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात दुपारी ४ वाजता पंचशील चौक फलकाचे अनावरण नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते, दुपारी पाच वाजता मार्गदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहणार आहे.

सायंकाळी सात वाजता सेवन स्टार नागपूर यांचा बुद्ध भीम गीताचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या संपूर्ण कार्यक्रमाला भद्रावती करांनी उपस्थित राहण्याचे आव्हान झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहूल सोनटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष भारत साबोरे यांनी केले आहे.

Share News

More From Author

शेगाव येथील समाज बांधवांना भांडी वितरण ग्राम पंचायत चा उपक्रम  Panchayat distribution to the community members of Shegaon is an initiative of Gram Panchayat

श्री अमर कोळी,अभिनेत्री वैशाली धुमाळे , मिनाक्षी पाखरे,गणेश हाजारी, मृणाली पोळ,गंगा तिकडे,ज्यु.रेणुका शहाणे, कृ.अनुराधा खांडेकर, उज्वला वर्मा यांना राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला Shri Amar Koli, actresses Vaishali Dhumale, Meenakshi Pakhre, Ganesh Hazari, Mrinali Pol, Ganga Tikde, Jr. Renuka Shahane, Kr. Anuradha Khandekar, Ujwala Verma were awarded the National Award

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *