मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साधणार आनंदाचा शिधा व इतर योजनेतील लाभार्थ्यांची संवाद Chief minister and deputy chief minister sadhnar Ananda’s ration and interaction with the beneficiaries of other schemes

222

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर( दि.13 एप्रिल) :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता लाभार्थ्यांची संवाद साधणार आहे. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होत आहे किंवा कसे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, रास्तभाव दुकानामार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी व समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे हे संवादाचे उद्दिष्ट असणार आहे. 

त्यासोबतच आनंदाचा शिधा संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस), तसेच शिवभोजन थाळी या विषयावर संवाद साधणार आहे.  

उपरोक्त योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 50 लाभार्थी संबंधित जिल्हा कार्यालयातील एनआयसीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स केंद्रात उपस्थित लाभार्थ्यांपैकी निवडक लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवाद साधणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.