महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत अनुदान देण्याचे आश्वासन वार्‍यावर Mahatma phule loan waiver scheme promises to provide subsidy to eligible beneficiaries till March 31

🔸शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदान मिळणार केव्हा शेतकरी पुत्र विनोद उमरे यांचा प्रश्न

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.12 एप्रिल) :- महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान ३१ मार्च ३०२३ पर्यंत देऊ असे आश्वासन राज्य सरकार यांनी दिले होते .पण ३१ मार्च २०२३ ही तारीख केली असून महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन पर अनुदाना काही मिळाले असल्याचे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हटले आहे.तर ३१ मार्च २०२३पर्यंत अनुदान देऊ राज्य सरकारचे आश्वासन वाऱ्यावर गेले असल्याचे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हंटले आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये मिळणार आहे.यामुळे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला.या योजनेंतर्गत है पैसे मिळणार होते.पण पात्र लाभार्थी शेतकरी याना प्रोत्साहन पर अनुदाना पासुन प्रतीक्षेत आहे.सन २०१७ ते २०२० या तीन वर्षां पैकी दोन वर्ष नियमितपणे पीक कर्जची परतफेड केली आहे.

अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे.पण ३१ मार्च २०२३पर्यंत ५० प्रोत्साहन पर अनुदान देऊन असे राज्य सरकारने आश्वासन वाऱ्यावर गेले आहे.कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकरी यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर ५० हजार अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी केली आहे .