पुरस्काराने नवीन ऊर्जा प्राप्त होत असते- प्रकाश मेश्राम Award brings new energy – prakash mesharam

✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा प्रतिनिधी)

मालेवाडा (दि.27 मार्च) :- 26 मार्च 2023 ला विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन हॉल झाशी राणी चौक नागपूर येथे नुकताच प्रकाश मेश्राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार ,मा डॉ. श्रीपाल सबनीस पुणे,प्रमुख अतिथी मा डॉ. के पी वासनिक दिल्ली ,मा मधुकर वानखेडे दिल्ली,मा दिपककुमार खोब्रागडे,ऍड. भुपेश पाटील,डॉ. रवींद्र तिरपुडे, डॉ. अनिल कालबां दे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

मेश्राम साहेब पुढे म्हणाले की पुरस्कार ने मानवाला ऊर्जा उर्मी मिळत असते तर हा पुरस्कार म्हणजे फुले ,शाहू ,आंबेडकर या विचारांच्या आदराची पावती आहे आणि निश्चितच आयुष्यात हे विचार मानवाला पुढे नेऊ शकतात.

तर याकरिता मला ज्यांनी इथे पर्यंत घडविण्या मला माझे आई वडील,गुरुजन ,भाऊ बहीण मित्र परिवार समस्त माझे ग्रामस्थ यांचा मी सदैव ऋणी राहीन. जीवन आहे तिथे संघर्ष आहे विना संघर्ष काहीच मिळत नसते हे विचार प्रकाश मेश्राम यांनी व्यक्त केले.