✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.18 मार्च) :- तालुक्यातील चंदनखेडा येथील श्रीमती मंगला गोपाळा हनवते यांना तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर हनवते यांच्या कडे तक्रार येताच यांनी तिला आपल्या हक्काचे घर मिळवून दिले. ती श्रीमती महिला मंगला गोपाळा हनवते वारंवार ग्राम पंचयतीमध्ये गेली.
साधारणता २-३ वेळा अर्ज केला परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने जागा मोजून दिली नाही याकडे दुर्लक्ष केले. व संबंधित प्रकरण नंतर हे प्रकरण ची तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तळमळीचे युवा मनोहर शालिक हनवते यांचे कडे आले .
यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत तंटामुक्तत समितीच्या माध्यमातून अविनाश हनवते व मंगला गोपाळा हनवते यांच्यातील आप- आपसातील जागेचा वाद प्रकरण मिटवून दिले त्यावेळी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी दिलीप कुडसंगे,
संतोष हनवते, अनिल जांभुले, ग्रामपंचायत सदस्य निकेश भागवत, ग्रामपंचायत सदस्या रंजना हनवते,प्रतिभा दोहतरे ,बालाजी महागमकार हे उपस्थित होते सर्वत्र गावकरी वर्गात तंटामुक्त अध्यक्षाचे व समितीचे कौतुक होत आहे.
